बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काँग्रेसकडून वादग्रस्त ट्विट डिलीट

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेलं वादग्रस्त ट्विट मागे घ्यायची वेळ काँग्रेसचं ऑनलाईन मॅगझिन 'युवा देश'वर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासोबतचा एक फोटो युवा देशनं ट्विट केला होता. 'आप लोगोंने देखा विपक्ष मेरे कैसे कैसे मेमे बनवाता है?' असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं होतं. 'उसे मेमे नही मेम कहते है' असं कॅप्शन ट्रम्प यांच्या फोटोला देण्यात आलं. त्यानंतर 'तू चाय बेच' असं कॅप्शन थेरेसा मे यांच्या फोटोला देण्यात आलं.
 
मोदींबद्दलचे हे वादग्रस्त ट्विट अंगाशी आल्यावर युवा देशनं हे ट्विट डिलीट केलं. पण भाजप नेत्यांनी यावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.