रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आता आस्वाद घ्या, वेगवेगळ्या प्रदेशांच्या व्यंजनांचा

एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेअंतर्गत 21 नोव्हेंबर 2017 रोजी येथील ओडिशा भवनात पुरणपोळीसह महाराष्ट्राचे व्यंजन खवय्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर, 24 नोव्हेंबर 2017 ला येथील महाराष्ट्र सदनात ओडिशाच्या चेना तरकारीसह महत्वाची व्यंजनांचा आस्वाद घेता येणार आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक भारत श्रेष्ठ भारत ही योजना केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने 31 ऑक्टोबर 2017 या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनापासून देशभर राबविण्यात येत आहे. 
 
राज्या-राज्यांमधील दुरावा कमी होऊन सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या माध्यमातून संबंध दृढ व्हावे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. देशातील 29 राज्य आणि 7 केंद्रशासीत प्रदेशांमध्ये असा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.