शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जागतिक टॅलेंटमध्ये भारत क्रमांक 51 वर

जागतिक टॅलेंटमध्ये भारत क्रमांक 54 वरून 51 वर आला आहे.याबाबत आयएमडी जागतिक सर्वेक्षण अहवालातून सांगण्यात आले आहे. ‘आयएमडी वर्ल्ड टॅलेंट’ अहवालानुसार भारतीय टॅलेंट 2013 पासून सातत्याने सुधारत आहे. भारताचा क्रमांक 2014 मध्ये केवळ एका पायरीने खाली आला होता. त्यानंतर 56, मागील वर्षी 54 व आता 51 वर आला आहे. 
 
आयएमडीने 63 देशांची शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक व विकास, शिक्षणाची माहिती व शिक्षणासाठीची तयारी अशा तीन मुख्य श्रेणीत सर्वेक्षण केले. शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक व विकास श्रेणीत भारताची स्थिती अद्याप बिकटच असून, त्यामध्ये क्रमांक 62 वा आहे.शिक्षणासंबंधी माहितीमध्ये 43 वा तर शिक्षणासाठीच्या तयारी श्रेणीत 29 वा क्रमांक आहे. एकूण क्रमवारीत भारतीय टॅलेंट 63 देशांमध्ये ५१ व्या स्थानी आहे. भारतात शिक्षणावर जीडीपीच्या तीन टक्के गुंतवणूक होत असून त्याची क्रमवारी 58 वी आहे. भारतात प्रत्येक विद्यार्थ्यावर जीडीपीच्या 16.8 टक्के खर्च होत असून, त्यात भारत 45 व्या स्थानी आहे.