शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई: विमानात महिलेची छेड करणाऱ्या 65 वर्षीय व्यापाराला अटक

दिल्लीहून मुंबईला येत असलेल्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात एका 41 वर्षीय महिलेची छेड काढण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी 65 वर्षीय व्यापाराला अटक करण्यात आली आहे.
 
दिल्ली येथील अनिल कुमार मूलचंदानी या व्यापार्‍याने बाजूला बसलेल्या महिलेची छेड काढली. महिलेने त्यावर विचित्र पद्धतीने स्पर्श करण्याचा आरोप केला आहे. त्या व्यक्तीला दोनदा समज देण्यात आली होती तरी त्याने हे कृत्य सुरू ठेवले. शेवटी महिलेने विमानातील कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. नंतर सहार पोलीस ठाण्यात या प्रकरणी पीडिताने तक्रार दाखल केली.
 
या प्रकरणी आरोपीवर आईपीसी सेक्शन 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.