पोलिसांच्या नावे जेवणारा, हप्ते घेणारा फुकट्या गुंड जेरबंद  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून हॉटेलमध्ये फुकट नेहमी जेवणारा, चोर भामटा गुंड, गुन्हे शाखा एकच्या पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो छोट्या व्यवसायीकांकडून हप्ते घेत असल्याचेही समोर आले आहे. 
				  													
						
																							
									  
	 
	सविस्तर माहिती अशी की, राजेंद्र मोहन पोटकर  वय ५५, रा. पिंपरी-चिंचवडअसे चलाख फुकट्या  भामट्याचे नाव आहे. हा सराईत गुन्हेगार आहे.  पुणे शहरात त्याच्यावर  अनेक गुन्हे दाखल आहे. भामटा चाकण परिसरात जाऊन तेथील हॉटेलमध्ये फुकटात जेवणावर ताव मारत होता, पैसे  जर मागितले तेव्हा मी गुन्हे शाखा पोलीस अधिकारी असल्याचे सांगत पैसे बुडवत असे, एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने छोटे व्यवसायिक म्हणजे पानटपरी, किराणा दुकानदार आणि हॉटेल चालकांकडून हप्ते घेतले होते,  पैसे न दिल्यास पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याची धमकी तो देत होता.  त्यामुळे हॉटेल चालक आणि छोट्या व्यवसायिक त्याला घाबरुन होते.गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून हॉटेलमध्ये फुकटात जेवणारा भामटा गुन्हे शाखा एकच्या पथकाने जेरबंद केले आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो छोट्या व्यवसायीकांकडून हप्ते घेत असल्याचेही समोर आले आहे.