धनगर आरक्षणाच्या आश्वासनाची मुख्यमंत्र्यांना आठवण आहे का?
निवडणुकांच्या वेळी मोठमोठ्या बाता मारायच्या आणि सत्तेत आल्यावर कुणी जाब विचारलाच, तर विरोधकांवर खापर फोडायचे हीच फडणवीस सरकारची नीती आहे. धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देऊ, अशा गमजा मारणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पाच वर्षे पूर्ण होत आली तरी धनगर आरक्षणाचे नावही काढले नाही.
जाब विचारला की सरळ विरोधकांवर ढकलण्याची युक्ती मुख्यमंत्री वापरत आहेत. पण जनता सगळे जाणून आहे. विरोधी पक्षांचे नेते, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी वेळोवेळी सर्व माध्यमांतून हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे दोषारोप करण्यापेक्षा मुख्यमंत्री महोदयांनी आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करावे, अन्यथा जनता घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही.