मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

शिवसेना बिहारमध्ये लोकसभा निवडणूक लढविणार

शिवसेनेने बिहारमध्ये लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आपले 40 उमेदवार उतरविणार आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. या सर्व जागांवर आपले उमेदवार असतील, अशी माहिती बिहार सेनेचे अध्यक्ष कौशलेंद्र शर्मा यांनी दिली. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही विधानसभेसाठी जोरदार शक्तीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
निवडणूक रिंगणात उतरताना पक्षाचा बिहारच्या विकासाचा आणि राष्ट्रवाद हा मुद्दा असेल. हा मुद्दा घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत. शिवसेना कधीही बिहारच्या विरोधात नव्हती. बिहारच्या मुद्द्याविरोधात शिवसेनेने राज ठाकरे यांचा पक्ष मनसेचाही विरोध केला आहे आणि टीकाही केली आहे. तसेच मुंबईतील छठ पूजामध्ये शिवसैनिकांचा सहभाग असतो, असे कौशलेंद्र शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.