बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूचा मृत्यू

मुंबईच्या भांडूपमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान एका २४ वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला आहे. या खेळाडूचे नाव वैभव केसकर असे आहे. क्रिकेट खेळता-खेळता अचानक वैभवच्या छातीत दुखायचला लागलं. त्यामुळे त्याने पंचांना सांगून मैदान सोडलं. छातीत जास्त दुखत असल्यामुळे वैभवचे काही मित्र त्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
भांडूपमध्ये सध्या क्रिकेट टूर्नामेंट सुरु आहेत. या टूर्नामेंटमध्ये वैभव हा गावदेवी संघाकडून खेळत होता. या सामन्यात गावदेवी संघाने प्रथम फलंदाजी केली. या फलंदाजीत वैभव तीन षटकं खेळला. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणाला आला. क्षेत्ररक्षणाला आल्यावर अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं. छातीत जास्त दुखायला लागल्यावर त्याने पंचांना सांगून मैदान सोडलं. त्याचे काही मित्र त्याला नजीकच्या भाऊसाहेब रुग्णालयात घेऊन गेले. तिथे उपचारादरम्यान वैभवचा मृत्यू झाला.