सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जानेवारी 2019 (16:31 IST)

सतर्क जीवनरक्षकांनी वाचविले सहा पोलिसांचे प्राण

मुंबईत सहा पोलिसांना घेऊन जाणारी एक बोट रात्री गिरगाव चौपाटीजवळ बुडाली, मात्र सतर्क जीवनरक्षकांनी तातडीने धाव घेतल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 
 
चौपाटीपासून तीनशे मीटर आत बोट बुडत असल्याचे लक्षात येताच तैनात असलेला जीवनरक्षक प्रतीक वाघे याने रेस्क्यू बोर्ड घेऊन तिथे धाव घेतली. या पोलिसांपैकी कुणीही जीवनरक्षक जॅकेट घातलेले नव्हते आणि ते बुडणार्‍या बोटीवर एकमेकांना धरून हादरलेल्या अवस्थेत उभे होते. त्यातील एकाला तर उलट्याही होत होत्या. हा प्रकार जीवनरक्षकाकडून समजल्याने गस्तीवरील बोटही तेवढ्यात तिथे दाखल झाली आणि या बोटीने सर्व सहा पोलिस किनार्‍यावर सुरक्षित आणण्यात आले.