यश मिळालं तर करोनाची लागण झाल्याणार्यांना कुत्रे देखील शोधून काढतील
कोरोनाशी लढा देणे आणि त्यावर उपचारासाठी जगभरात वेगवेगळ्या पर्यांयांवर काम केले जात आहे. ब्रिटनचे संशोधक कुत्र्यांकडून काही मदत घेता येईल का यावर शोध करत आहे.
ब्रिटनमध्ये या शोधावर मोठी तयारी केली जात आहे. यासाठी फंड देखील जाहीर करण्यात आले आहे. या शोधात यश मिळाले तर आपल्याला मेडिकल टीमसह कुत्रे देखील दिसतील.
ब्रिटनचे संशोधक हे बघण्याचा प्रयत्न करत आहे की काय कुत्र्यांमध्ये कोविड-19 चे रुग्ण ओळखण्याची क्षमता आहे का? ब्रिटिश सरकारप्रमाणे या रिसर्चवर पाच लाख पाउंड खर्च करण्यात येत आहे. हा शोध लंडन स्कूल ऑफ हायजीन ऐंड ट्रॉपिकल मेडिसिन, दुरहम युनिव्हर्सिटी आणि मेडिकल डिटेक्शन डॉग्स सोबत करण्यात येत आहे.
इनोव्हेशन मंत्री जेम्स बेथेल यांनी याबद्दल सांगितले की 'बायो-डिटेक्शन डॉग्स विशेष प्रकाराच्या कर्करोग ट्रेस करतात आणि आम्हाला वाटतं की या इनोव्हेशनचे त्वरित परिणाम मिळतील ज्याने आमची टेस्टिंग क्षमता वाढेल.'
6 लॅब्राडोर आणि कॉकर स्पेनील्सला कोरोना रुग्णांच्या शरीराचे वासाचे नमुने देण्यात येतील. हे रुग्ण लंडनच्या विभिन्न रुग्णालयातील असतील. त्यांना आजारी आणि निरोगी यांच्यात अंतर शिकवण्यात येईल. मेडिकल डिटेक्शन डॉग्स यांच्याप्रमाणे त्यांनी सुरुवातीला कर्करोग, पार्किंसन आणि मलेरिया आजार ओळखण्यासाठी कुत्र्यांना ट्रेनिंग दिली होती.
हे यशस्वी ठरलं तर एक कुत्रा सार्वजनिक स्थळावर किमान एका तासात 250 रुग्णांची ओळख करू शकतील. या प्रकाराचा शोध अमेरिका आणि फ्रान्समध्ये करण्यात येत आहे. अमेरिका, नेदरलँड्स आणि हॉन्ग कॉन्गचे पशू चिकित्सकांप्रमाणे जगातील अनेक कुत्रे कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत.