गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : सोमवार, 11 मे 2020 (09:59 IST)

पुण्यात ‘COVID19 antibody’ चा शोध घेणारी पहिली स्वदेशी टेस्ट किट तयार

पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने COVID19 अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी चाचणी किट तयार केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबाबत माहिती दिली.
 
जास्त लोकसंख्या असलेल्या परिसरात करोना व्हायरस संसर्गावर पाळत ठेवण्यात आणि कोरोना संक्रमितांची ओळख पटवण्यास ही किट महत्वपूर्ण भूमिका निभावेल तसेच अडीच तासांमध्ये ९० चाचण्या घेण्याची या किटची क्षमता आहे अशी माहितीही देण्यात आली आहे.
 
याशिवाय, कोविड-१९ (कोरोना) विषाणूवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी जगभरात अनेक देश प्रयत्नशील आहेत. त्यात भारताचाही समावेश असून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड हे संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणार आहेत.