मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 4 मे 2020 (22:25 IST)

करोना रुग्ण वाढण्याची शक्यता: आरोग्य मंत्री

पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा व सोलापूर जिल्ह्यांत करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना येत्या काळात ही संख्या अधिक होऊ शकते. अशात नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना तयार करून सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्यावात, अशा सूचना आज ससून रुग्णालयात घेतलेल्या आढावा बैठक दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
 
जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करून मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती तातडीने करावी, कारोनाबाधित रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावात. तसेच करोनाबाधित नसलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, करोनाबाधित रुग्णांना उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस तसेच वार्डमधील सफाई कामगार यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावात, विलगीकरण कक्षातील नागरिकाला जेवण, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच शौचालय आणि परिसरातील स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावे. भविष्यात करोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेवूनच जास्तीत बेडची सुविधा निर्माण करावी, अशा सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.