शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 29 एप्रिल 2020 (17:14 IST)

मुंबईत करोना रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी

मुंबईच्या लिलावती रुग्णालयात करोना रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरपी करण्यात आली असून थेरपी यशस्वी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 
 
राजेश टोपे यांनी सांगितलं की लिलावती रुग्णालयात दाखल करोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली असून त्यात यश मिळालं आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी थेरपी यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे. आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे. ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. तसेच पुण्यातही हा प्रयोग करणं शक्य असल्याचं ते म्हणाले. 
 
या थेरपीत करोना व्हायरसमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अ‍ॅंटीबॉडीज असलेले रक्त काढून ते करोनाग्रस्त रुग्णांवर वापरले जाते. सर्वप्रथम चीनमध्ये या थेरपीने उपचार करण्यात आले.

फोटो: सांकेतिक