रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 28 एप्रिल 2020 (22:51 IST)

मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या ५ हजार ९८२

मुंबईत सतत करोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. काळजी वाढवणारी बातमी म्हणजे आज दिवसभरात मुंबईत ३९३ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकट्या मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या ५ हजार ९८२ इतकी झाली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
 
मुंबईत करोना मृत्यू दर खाली गेला होता. मात्र आता मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. मृतांच्या संख्येत आणखी २५ जणांची भर पडली आहे. गेल्या २४ तासात करोनाचे २० रुग्ण दगावले आहेत. तर २३ ते २५ एप्रिल दरम्यान ५ मृतांची नोंद झाली होती. 
 
मुंबईतल्या दाटवस्ती असणार्‍या धारावीत आज ४२ नवे रुग्ण सापडले. धारावीतील करोनाबाधितांची संख्या आता ३३० झाली आहे. येथे आज चार करोना बाधितांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत धारावीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
आज मृत झालेल्या रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. दोन रुग्ण ६० वर्षे वयाचे एक रुग्ण ५५ वर्षांचा तर एक रुग्ण ४८ वर्षांचा आहे.