1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2020 (17:55 IST)

मुंबई-पुण्यात लॉकडाउन 18 मे पर्यंत वाढवला जाऊ शकतो: आरोग्यमंत्री

देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या 3 मे रोजी संपणार आहे. पण मुंबई आणि पुणे या दोन शहरात लॉकडाउनचा कालावधी 18 मे पर्यंत वाढवण्यात येऊ शकते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल संकेत ‍दिले.
 
मुंबई आणि पुण्यात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या निर्णय घेतला जाऊ शकतो. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती एका ऑनलाईन पोर्टलशी बोलताना दिली. 
 
लाइव्ह मिंटशी बोलताना ते म्हणाले की “करोना व्हायरसचा वेगाने पसरत असून याचा फैलाव रोखणे हा लॉकडाउन करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. अशात फैलाव कमी होत नसेल तर राज्यात लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागेल.