बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 23 एप्रिल 2020 (09:25 IST)

राज्यात कोरोना बाधित ७८९ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज ४३१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ५६४९ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
आज राज्यात कोरोनाबाधीत ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५ हजार ६४९ झाली आहे. ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ५ हजार २१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७,८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
आज राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई  येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९  महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे.  या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९० हजार २२३ नमुन्यांपैकी ८३ हजार ९७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५६४९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९ हजार ७२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,०५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
आज राज्यात १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता २६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई  येथील १०, पुणे येथे २, औरंगाबाद येथे २ तर कल्याण डोंबिवली येथे १, सोलापूर मनपा येथे १, जळगाव येथे १आणि मालेगाव येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  आज झालेल्या मृत्यूंपैकी १४ पुरुष तर ४ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ५  रुग्ण आहेत तर १२  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे.  या १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६१ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
 
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
 
(या तक्त्यातील रुग्ण संख्या  रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा / मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात  संसर्गग्रस्त  झालेले आहेत.)
 
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४३२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६६११  सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी २६.८९ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.