रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (16:04 IST)

आनंदवार्ता, मणिपूर झाले कोरोनामुक्त राज्य

गोव्यानंतर मणिपूर राज्य कोरोना विषाणूपासून मुक्त झाल्याची माहिती मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांनी सोमवारी दिली. कोरोनाची लागण झालेले दोन रुग्ण बरे झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. रविवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती दिली होती. परंतु केंद्राने घोषित केल्यानुसार ३ मेपर्यंत गोव्यातही लॉकडाऊन असणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं होत.

‘मला मणिपूर कोविड-१९ पासून मुक्त झाल्याबद्दल सांगत असताना खूप आनंद होत आहे. राज्यात कोरोनाची लागण झालेले दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्याचा अहवाला निगेटिव्ह आला आहे. आता राज्यात कोरोनाचा एक रुग्ण नाही’, असं मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांनी सांगितलं.

ईशान्य भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सोमवारपासून काही ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. ईशान्य भारतात रविवारपासून एक नवीन रुग्ण आढळला नाही.