रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 21 एप्रिल 2020 (15:51 IST)

8.89 कोटी शेतकर्‍यांना 17 हजार 793 कोटींची मदत

लॉकडाऊन कालावधीत शेतकर्‍यांसाठी आणि शेतीकामासाठी भारत सरकारचा कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग अनेक उपायोजना करीत आहे.

अद्यावत माहिती पुढीलप्रमाणेः
24 मार्चपासून आजपर्यंतच्या लॉकडाऊन कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेअंतर्गत सुमारे 8.89 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला असून यासाठी आत्तापर्यंत 17,793 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

कोविड -19 महामारीमुळे उद्भवलेल्या सध्याच्या परिस्थितीत अन्न सुरक्षा देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याणयोजनेंतर्गत (पीएम-जीकेवाय) पात्र कुटुंबांना डाळींचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सुमारे 107,077.85 मेट्रिक टन डाळ वाटपासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे देण्यात  आली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंदमान आणि निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, दमण आणि दीव, गोवा, गुजरात या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी लाभार्थ्यांना डाळींचे वितरण सुरू केले आहे.

मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसारख्या इतर राज्यांना आंशिक साठा मिळाला आहे आणि त्यांच्या नियोजनानुसार लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने वितरण केले जाईल.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत डाळींच्या वितरणामुळे 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 19.50 कोटी घरांना लाभ मिळणार आहे.