मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 15 एप्रिल 2020 (13:49 IST)

कोरोनाची साखळी तुटण्यास लागतात 28 दिवस

प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य केल्यास आणि सर्व नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव थांबून साखळी तुटेल. असे झाल्यास जिथे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत तिथे 28 दिवसांत नवीन रुग्ण आढळलाच नाही तर कोरोनाची साखळी तुटली असे स्पष्ट होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 10363 वर गेली आहे. गेल्या 24 तासांत 1211 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 31 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यानुसार देशातील मृतांची एकूण संख्या वाढून 339 इतकी झाली आहे. तर 1036 जण कोरोनामुक्त झाले आहेत.