Coronavirus : सर्व राज्यांना ICMRची सूचना, रॅपिड टेस्ट थांबवा
नवी दिल्ली – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) सर्व राज्यांनी पुढील दोन दिवस रॅपिड टेस्टिंग किट्सचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही राज्यांत हा टेस्टिंग किट फोल ठरत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या झालेल्या बैठकीत हि माहिती देण्यात आली.
चीनकडून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्स चुकीच्या आहेत, असा दावा राजस्थान या राज्याचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी केला होता. त्यामुळे राजस्थानमध्ये या किट्सचा वापर थांबवण्यात आला आहे. तसंच दोन दिवसांनंतर या संदर्भात नव्याने दिशानिर्देश जारी करण्यात येतील, अशी माहिती आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्रात हॉटस्पॉट असलेल्या भांगात ७५ हजारांहून अधिक रॅपिड टेस्ट करण्यात येणार होत्या.