शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : सोमवार, 20 एप्रिल 2020 (16:22 IST)

बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांकडून मोठा निर्णय

कोरोना प्रादुर्भावामुळे बद्रीनाथ आणि केदारनाथ या दोन्ही मंदिरांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मंदिराची कवाडं उघडण्याच्या तारखांच आहे. नव्या निर्णयानुसार बद्रीनाथ मंदिराची कवाडं आता १५ मे रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडणार आहेत. तर, केदारनाथ मंदिराचे द्वार हे एक दिवस आधी, म्हणजेच १४ मे रोजी उघडणार आहेत. दरम्यान, गंगोत्री आणि यमुनोत्रीधाम ठरलेल्या तारखांनाच म्हणजे २६ एप्रिललाच खुले होणार आहेत.
 
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालाधी आणखी वाढवण्यात आला. ज्यानुसार आता ३ मे रोजी देशातील ल़ॉकडाऊन शिथिल केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं. ज्यामुळेच बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांचे द्वार उघडण्याच्या तारखाही बदलण्यात आल्या.
 
हा निर्णय येण्यापूर्वी, बद्रीनाथ मंदिराची कवाडं ३० एप्रिल रोजी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भाविकांसाठी खुली होणार होती. पण, कोरोनाचं एकंदर सावट पाहता, चारधान यात्रेशी संबंधित हे महत्त्वाचे निर्णय मंदिर प्रशासनाला घ्यावेच लागले.