शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 20 एप्रिल 2020 (22:32 IST)

महाराष्ट्रात आजपर्यंत ५०७ रुग्ण करोनामुक्त

महाराष्ट्रात आजपर्यंत ५०७ रुग्ण हे करोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ७६ हजारांच्या वर चाचण्या केल्या गेल्या आहेत. तसेच करोनाची लक्षणं न दिसणाऱ्यांची संख्या अधिक आहे. थोडीशी जरी लक्षणं आढळली तर तातडीने डॉक्टरांकडे जा असंही आवाहन राजेश टोपे यांनी केलं.
 
महाराष्ट्रात करोनाचे ४६६ नवे रुग्ण मागील चोवीस तासात आढळले आहेत. चोवीस तासात ६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ४६६६ इतकी झाली आहे.
 
आत्तापर्यंत राज्यात २३२ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला. तसेच करोना रुग्णांची संख्या ४ हजार ६६६ वर पोहचली आहे. ही संख्या जरी मोठी दिसत असली तरीही ८१ टक्के रुग्ण हे अगदी व्यवस्थित आहेत. घाबरुन जाऊ नका, पण करोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका असंही आवाहन त्यांनी सांगितलं.