1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified मंगळवार, 14 एप्रिल 2020 (21:41 IST)

महाराष्ट्रात 350 नवे कोरोना रुग्ण, दिवसभरात 18 मृत्यू, रुग्णसंख्या 2684

राज्यात आज कोरोनाच्या 350 नवीन रुग्णांची नोंद झाली. या प्रकारे महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 2684 वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 259 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
सध्या राज्यात 67 हजार 701 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 5647 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान आज राज्यात 18 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे राज्यातील मृतकांची संख्या आता 178 झाली आहे. 
 
ज्या 18 रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी 12 पुरुष रुग्ण होते आणि सहा महिला आहेत. 18 पैकी 11 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातले आहेत. 18 पैकी 13 रुग्णांना मधुमेह, ब्लड प्रेशर, अस्थमा, हृदयरोग असे विकार होते. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे 11, पुण्यातील 4 तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. एक मृत्यू राज्याबाहेरील नागरिकाचा आहे.