1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified सोमवार, 6 एप्रिल 2020 (22:51 IST)

नागपुरात करोनाचा पहिला बळी

एका ६५ वर्षीय नागरिकाचा करोनाची बाधा झाल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यू रविवारी रात्री झाला असून सोमवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील हा करोनाचा पहिला बळी ठरला आहे. या रुग्णाची प्रवासाची पार्श्वभूमी नव्हती.
 
या रुग्णाचा अहवाल सकारात्मक आल्याने दुपारपासून प्रशासन त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधत असून एकही नातेवाईक त्याचा मृतदेह घेण्यास फिरकलेला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.  हा समुदाय प्रादुर्भावाचा पहिला बळी असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे.