बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रायगड , शनिवार, 4 एप्रिल 2020 (08:43 IST)

अलिबागच्या मतिमंद मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार

संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विरोधात लढत असताना अलिबागच्या रेवदंडा येथून घृणास्पद प्रकार समोर आला आहे. रेवदंडा येते ही मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहते. ती मतिमंद असल्याने तिचा गैरफायदा घेण्यासाठी परिसरातील सात जणांनी तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याने पीडिता गरोदर राहिली आहे.

पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी सातही नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे.