रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 16 मार्च 2020 (12:34 IST)

मैत्रिणीच्या वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म, गर्भवती राहिल्यावर आरोपीला अटक

हा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमधील चिमूर तालुक्यात घडला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तेव्हा पोलिसांनी आरोपीला अटक केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार 12 वर्षीय मुलगी अभ्यासासाठी आपल्या मैत्रिणीकडे जात असे. आरोपीने याचा फायदा घेत तिच्यावर दुष्कर्म केले. याबद्दल कोणालाही कळता कामा नये नाहीतर जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेच्या भीतीचा फायदा घेत आरोपीने वारंवार घाणेरडे कृत्य केले. इकडे मुलीचं पोट दुखत असल्यामुळे पीडितेची आई तिला डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन गेली तेव्हा मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.
 
कुटुंबियांनी मुलीकडे चौकशी केल्यावर घडलेला प्रकार उघडकीस आला. यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. योगेश दोहतरे असं आरोपीचं नाव आाहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.