सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 12 फेब्रुवारी 2020 (10:21 IST)

सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक दुष्कर्म

सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक दुष्कर्म करण्यात झाला आहे. १० जणांनी मिळून मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमधील बहुतांश जण रिक्षाचालक आहेत. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेते. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिराजवळ ती रडत बसली असताना एका नागरिकाने पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. जुलै महिन्यापासून हा प्रकार सुरु होता.