गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (08:34 IST)

पुरुषी मानसिकता ‘नाही’ म्हणणाऱ्या स्त्रियांना मानतच नाही : रेणुका शहाणे

वर्ध्याच्या हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा सोमवारी मृत्यू झाला. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीदेखील साऱ्या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. समाजातील पुरुषी मानसिकता ही ‘नाही’ म्हणणाऱ्या स्त्रियांना मानतच नाही. या घटनांना आळा कसा घालायचा हेही कळेनासं झालं आहे. कारण छोट्या घटनांची जेव्हा तक्रार केली जाते तेव्हा महिलांची गंभीरपणे दखल घेतली जात नाही. एखादा मुलगा माझा पाठलाग करतोय अशी तक्रार जर महिलेने पोलिसांकडे केली तर त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, अशी खंत रेणुका शहाणे यांनी व्यक्त केली. 
 
हे प्रकार रोखण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये लैंगिक शिक्षणासोबत मुलींकडे बघण्याचा मुलांचा दृष्टीकोन कसा असायला पाहिजे हेसुद्धा शिकवायला पाहिजे. मुलीचा होकार म्हणजे काय आणि तो किती महत्त्वाचा आहे याबद्दल चर्चा झाली पाहिजे, असे रेणुका शहाणे यांनी सांगितले.