बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (08:35 IST)

राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २४ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार  आहे. हे अधिवेशन १८ दिवस म्हणजेच २० मार्च पर्यंत चालणार आहे. १८ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला जाणार आहे. ६ मार्च रोजी ११ वाजता राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला जाणार आहे अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली आहे.
 
दरम्यान, १८ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात ६ मार्च रोजी ११ वाजता राज्याचा अर्थसंकल्प दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार असून, राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर ५ मार्चला महिला सुरक्षा कायद्यावर विशेष चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेदरम्यान संबंधित प्रकरणात आरोपींना त्वरीत शिक्षा करण्याबरोबरच आंध्रप्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्यात कायदा करण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे २६ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव करण्याचा ठराव मांडण्यात यावा अशी मागणी भाजपने केली आहे.