मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (10:26 IST)

गडचिरोलीत सामूहिक आत्महत्या, मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग

Gadchiroli suicide
मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने नाराज कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत घडला. एकाच कुटुंबातील तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 
 
विवेकानंदनगर येथे 24 वर्षीय मुलीने अन्य जातीतील मुलाशी लग्न केल्याच्या रागातून आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली. रवींद्र नागोराव वरगंटीवार (50), वैशाली रवींद्र वरगंटीवार (43) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार (19) अशी आत्महत्या केलेल्यांची नावं आहेत. 
 
रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीने अन्य जातीच्या मुलासोबत प्रेम विवाह करण्यासाठी वडिलांची परवानगी मागितली. मात्र, घरच्यांनी नकार दिला. परंतू प्रेमविवाह करण्यासाठी मुलगी घरातून पळून गेली. नंतर तिने मंदिरात विवाह केल्याचं समजलं. या प्रकाराने वरगंटीवार कुटुंबाने तणावात येऊन टोकाचं पाऊल उचललं.
 
कुटुंबातील तिघांनीही विवेकानंद नगर परिसरातील विहिरीत उड्या घेऊन आत्महत्या केली.