मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 16 मार्च 2020 (09:50 IST)

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३३

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३३ वर पोहोचली आहे. राज्यातल्या १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेत. औरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. या महिलेला धुत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही महिला रशियातील कझागिस्तानमधून आली होती. या घटनेनंतर आता राज्यातील कोरोनाबिधित रुग्णांची संख्या ३३ वर पोहोचली आहे. देशात सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. 
 
महाराष्ट्रातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ५ आणि औरंगाबादमध्ये १ रुग्ण आढळून आला. संध्याकाळी पुण्यात आणखी एका रुग्णाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय एकूण ९५ संशयित रुग्णांना राज्यातल्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढली असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हा संसर्गजन्य रोग असला तरी रोग प्रतिकार क्षमतेच्या जोरावर तो रोखता येऊ शकतो. त्यासाठी शासनाने, डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.