सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुवाहाटी , शनिवार, 28 मार्च 2020 (15:37 IST)

‘गोल्डन गर्ल' हिमा दासकडून कोरोनाग्रस्तांसाठी महिन्याचा पगार

भारताची आघाडीची महिला धावपटू हिमा दासने कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात आपले महत्त्वाचे योगदान बजावले आहे. आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक विजेत हिमादासने आपला एका महिनचा पगार आसाम सरकारच्या आरोग्य विभागाला दिला आहे. हिमाने आपल्या टि्वटर अकाउंटवर यासंदर्भातली घोषणा केली आहे.
 
जगभरात अनेक लोक करोना विषाणूच्या विळख्यात आलेली आहेत. चीन, फ्रान्स, इटली यासारख्या देशांना कोरोनाचा अधिक फटका बसला आहे. अनेक लोकांनी यामुळे आपले प्राणही गमवाले आहेत. जागतिक आरोग्य संघटना या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करते. भारतामध्येही महत्त्वाच्या शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. हिमा दाससोबत भारताधील अनेक क्रीडापटूंनी कोरोनाविरोधातील लढ्यात आपले योगदान दिले आहे.