बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : शनिवार, 28 मार्च 2020 (12:23 IST)

Coronavirus: धक्कादायक! 24 तासांत इटलीमध्ये घेतला सुमारे 1000 जणांचा बळी

चीनच्या वुहान या शहरातून उद्भवलेल्या कोरोना विषाणूने इटलीत हाहाकार माजवला आहे. बातमीनुसार इटलीत 24 तासांत सुमारे एक हजार जणांचा बळी गेला आहे. इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. 
 
इटलीत एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. इटलीमध्ये एका दिवसांत 969 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आणखी 26 हजार नागरिकांना या व्हायरची लागण झाली आहे. आतापर्यंत इटलीमध्ये एकूण 9134 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
इटलीनंतर इराणमध्ये एका दिवसात 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर, स्पेनमध्ये 569 लोकांच्या मृत्यूची नोंद आहे. 
 
यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. या महामारीमुळे जगातील सर्वाधिक शक्तीशाली देश असणाऱ्या अमेरिकेलाही मोठा फटका बसला आहे. करोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत 1477 जणांचा बळी घेतला आहे.