मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 4 एप्रिल 2020 (12:17 IST)

देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो का? राम कदम यांचा सवाल

देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो का? असा प्रश्न भाजप नेते राम कदम यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता आपआपल्या घरातील लाईट बंद करुन 9 मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोनाविरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र, यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आक्षेप घेतला आहे.
 
“9 मिनिटे एकाचवेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य आणि देश अंधारात जाण्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे जनतेनेआवश्यक तितकेच लाईट चालू ठेऊन, दिवे, मेणबत्ती लावावेत”, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी जनतेला केले आहे. मात्र, त्याच्या याच आवाहनावर राम कदम यांनी टीका केली.