शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सामन्याचा अग्रलेखात चंद्रकांत पाटलांचा उल्लेख चांदमियां पाटील

“भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे. याचा अनुभव 100 दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला,” अशी खोचक टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांवर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अग्रलेखात चंद्रकांत पाटलांचा उल्लेख चांदमियां पाटील असा करण्यात आला आहे.
 
“प्रदेश भाजपचे अध्यक्ष चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी  करण्यात यावी. ते म्हणाले, ‘‘माझी छाती फाडली तर त्यात श्रीराम दिसतील.’’ चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे. राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ‘ठाकरे सरकार’च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत. तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. श्रीरामाला त्रास होईल,” असा सल्लाही सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला आहे.