शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : सोमवार, 20 एप्रिल 2020 (17:07 IST)

मुंबईत 50 हून अधिक पत्रकारांना करोनाची लागण

कोरोनाच्या संकटकाळात थेट ग्राउंड रिपोर्ट नागरिकांनापर्यंत पोहचवणारे पत्रकार देखील आता संकटात पडत आहे. मुंबईमध्ये 50 हून अधिक पत्रकारांना करोनाचा संसर्ग झाल्याचे कळून आले आहे. पत्रकार संघानं मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या करोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित केला होता. त्या रिपोर्ट्सप्रमाणे 50 हून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. 
 
यापैकी बहुतांश पत्रकार हे टीव्ही चॅनेलमध्ये काम करणारे आहेत. तर यामध्ये काही कॅमेरामन आणि त्यांच्या गाड्यांच्या ड्रायव्हर्सचाही समावेश आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहेत. 
 
टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन आणि मंत्रालयातील पत्रकार संघाच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकांराच्या करोना चाचणीसाठी विशेष कॅम्प आयोजित केला होता. चाचणी करताना बर्‍याच पत्रकारांना कोणतीही लक्षणे नव्हती तसेच अद्याप काही पत्रकारांच्या चाचणीचा रिपोर्ट्स पुढील काही ‍दिवसात येतील अशात ही संख्या वाढू देखील शकते. 
 
पत्रकारांनी त्यांचं कर्तव्य बजावताना स्वतःची योग्य काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. तसंच ही घटना अत्यंत दुःखद असल्याचही त्यांनी म्हटलंय.