शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मुंबई (महाराष्ट्र) , सोमवार, 20 एप्रिल 2020 (16:40 IST)

कोविड - १९ नंतर इम्यून लिव्हिंग सुनिश्चित होईल

भारतीय रिअल इस्टेट क्षेत्र बदलत्या जागतिक आणि राष्ट्रीय आर्थिक परिस्थिती व प्रस्तावित इस्टेट कायद्यांसह नियमित बदलच्या स्थितीत आहे. आर्थिक परिस्थितीत प्रत्येक वेळी बदल होत असताना, क्षेत्र प्रगती करण्यासाठी निरंतर संघर्ष करत आहे; भावना नीट असल्याचे खात्री करते आणि खरेदीदारांकडून मागणी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करते.
 
विकसक बदलत्या वातावरणचा फायदा घेण्यासाठी आणि खरेदीदारांना ऑनलाइन गुंतवून ठेवत मागणी निर्माण करण्यासाठी व वाढवण्यासाठी प्रॉपर्टीचे नवीन स्वरूप आणत आहेत. खरेदीदार देखील अधिक विवेकी होत आहेत आणि मत व्यक्त करण्यासाठी व चांगल्या गुणवत्तेची आणि सेवांची मागणी करण्यासाठी ऑनलाइनला व्यासपीठ म्हणून वापरत आहेत.
“घर खरेदीदार अलीकडे अधिक जागरूक आहेत आणि अनुभवात्मक जगण्याकडे पाहत आहेत. यावर्षी कोविड - १९ नंतर आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्तीसह निरोगीपणा प्राधान्य घेणार असे  सुनिश्चित होईल. ग्रीन होम पारंपारिक घरांच्या तुलनेत निरोगी, टिकाऊ आणि जास्त ऊर्जा-कार्यक्षम म्हणून समजले जातात, खरेदीदार आणि विकसक दोन्ही बदल ला स्वीकारत आहेत,” श्री. अशोक मोहनानी, उपाध्यक्ष, नरेडको (महाराष्ट्र)
 
ग्रीन होम सौर उर्जा पॅनेलद्वारे चालविले जाते, नैसर्गिक संसाधनाचे जतन करण्यासाठी त्यात इको-फ्रेंडली टॉयलेट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम असते. ऑनलाईन शोधात अशा काही सुविधा येतात: उपासनास्थळे: निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये विशेषत: वयोवृद्ध घर खरेदीदारांमध्ये जास्त वजन ओढणारा एक महत्त्वपूर्ण निर्धारक म्हणजे प्रकल्पच्या आसपासच्या ठिकाणी उपासनास्थानाची उपलब्धता.
 
नाइट फ्रँकच्या दी वेल्थ रिपोर्ट - इनसाइट सिरीज २०१९ नुसार, वेलनेस-बेस्ड लिव्हिंग ने त्यांच्या शेजार्‍यांच्या तुलनेत मूल्यांमध्ये जवळजवळ एक तृतीयांश पेक्षा अधिक वाढ पहिली आहे. गोरेगाव, कांदिवली येथे जैन मंदिर असल्याने निवासी मालमत्ता वर्गाला ते वाढीव मूल्य देऊ देऊ शकतात. वॉकिंग ट्रॅकसह एक मोकळी जागा ग्राहकांच्या इच्छित सूचीवर आहे. वैद्यकीय सुविधा: जेव्हा आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा आणखी एक बाब म्हणजे फिजिशियन क्लिनिक, मेडिकल स्टोअर्स आणि हॉस्पिटलची संख्या. 
 
“नॅशनल असोसिएशन नरेडको या नात्याने हे कल पाहून आम्ही घर खरेदीदाराच्या या प्रश्नांची उत्तरे देणारी व खरेदीदाराच्या गरजांच्या आधारे अंतर्दृष्टी बरोबर तपशील देणारे एक व्यासपीठ HousingForAll.com बनवण्याच्या दिशेने कार्य करीत आहोत,” श्री मोहनानी म्हणाले.
 
घर खरेदीदारांवर गृहनिर्माण पोर्टलचा प्रभाव मर्यादित नाही. म्हणूनच, नरेडकोचा प्रयत्न HousingForAll.com च्या सहकार्याने हे सुनिश्चित करणे कि आम्ही सर्वांसाठी गृहनिर्माण अभियानाच्या दिशेने वाटचाल करू आणि परवडणारी गृहनिर्माण, सेमी-लक्झरी, लक्झरी गृहनिर्माण यांच्या गरजा संबोधित करणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून संवाद साधण्याच्या विविध पद्धतींद्वारे त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला पाहिजे.