रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 एप्रिल 2020 (11:40 IST)

कनिका कपूर करोनामुक्त

गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा सहावा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ती करोनामुक्त झाली आहे. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS) याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू होते.
 
यापूर्वी कनिकाचा पाच वेळा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 20 मार्च रोजी तिचा पहिला करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कनिकाला करोनाची लागण झाल्यापासून ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय होती. कारण या दरम्यान जवळपास 300 लोकं तिच्या संपर्कात आले होते.