गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 7 एप्रिल 2020 (22:03 IST)

कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी तीन मीटरचे सुरक्षित अंतर ठेवा: आरोग्यमंत्री

कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी तीन मीटरचे अंतर राखा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राजेश टोपे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भातला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 
 
मी गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही, मी गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही, मीच माझा रक्षक, मी घरात थांबणार आणि करोनाला हरवणार आपण सर्व कोरोना विरुद्धची लढाई जिंकू या..!
 
करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग एकच मंत्र आहे. प्रत्येकाने किमान तीन मीटरचे अंतर पाळावे तसेच गर्दीत जाणं टाळवा, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.