शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (10:24 IST)

मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करणार

मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. त्यांनी म्हटले की लॉकडाउनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल. 
 
राजेश टोपे यांनी फेसबुकवर संवाद साधताना म्हटले होते की जर सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचं योग्य पालन केलं तर दारुच्या दुकांनावर कोणतीही बंदी असणार नाही मात्र दारुची दुकानं कधी सुरु होतील याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नव्हती. 
 
राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना माहिती दिली की, “हायड्रोक्लोरोक्विनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते म्हणून मुंबईत काही भागात या गोळ्या वाटपासाठी मान्यता दिली आहे. मात्र, ज्यांना हृदयविकार आहे किंवा ६० वर्षांवरील आणि १५ वर्षाखालील व्यक्तींना त्या दिल्या जाणार नाहीत.” 
 
तसेच केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास दिली मान्यता दिली असून त्यानुसार राज्यात ७५ हजार चाचण्या होणार, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.