सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 26 एप्रिल 2020 (09:20 IST)

महाराष्ट्रात 811 नवे कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाचे 811 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये एकट्या मुंबईमधील 281 रुग्णांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासांत 22 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता 7 हजार 628 इतकी झाली आहे. तर आतार्यंत महाराष्ट्रात कोरोनाची लागण होऊन 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल 119 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत  1076 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात 22 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या 22 रुग्णांच्या  मृत्यूंपैकी मुंबईत 13, पुण्यात 4, पुणे ग्रामीण भागात 1, पिंपरी चिंचवडमध्ये 1, मालेगावात 1, धुळे शहरात 1 मृत्यू झाला आहे. 22 रुग्णांच्या मृत्यूंपैकी 16 पुरुष तर सहा महिला होत्या. 60 वर्षे वरचे 11 रुग्ण यामध्ये होते. 8 रुग्ण हे 40 ते 59 या वोगटातले होते. तर 3 रुग्ण हे 40 वर्षांखालील होते. 22 रुग्णांचे मृत्यू झाले त्यामधील 13 रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अति जोखीचे आजार होते. कोरोनामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 22 जणांचा मृत्यू; कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,6 मुंबईत कोरोनाचे 281 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून चोवीस तासांत कोरोनामुळे 12 रुग्णांचा म मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही आता 4 हजार 870 इतकी झाली आहे. 167 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत मुंबईतील 762 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.