बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (16:26 IST)

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू दर घटला, आता केवळ पाचच ठिकाणे हॉटस्पॉट

कोरोनाचा मुकाबला करताना राज्यातील मृत्यूदर घटला असून गेल्या १५ दिवसांत जागतिक सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्राचा मृत्यूदर ४.४० टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. तर जागतिक मृत्यूदर ६.९० टक्के इतका आहे. ही चांगली बाब असून राज्यातील १४ हॉटस्पॉटमध्येही घट आलेली आहे. आता केवळ पाचच ठिकाणे हॉटस्पॉट आहेत, असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे. 
 
 याआधी जागतिक सरासरीच्या तुलनेत राज्याचा मृत्यूदर जास्त असल्याचे आकडेवारी दर्शवत होती. मात्र आता बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे मृत्यूदरात घट झाली आहे. आज हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्याचा मृत्यूदर ४.४० टक्के आहे तर जागतिक मृत्यूदर ६.९० टक्के इतका आहे. राज्यात कोरानाबाधितांची संख्या ६४२७ इतकी झाली. आजपर्यंत ७७८ नव्या रुग्णांची भर पडलीय. राज्यात बळींची संख्या २८३ इतकी झाली आहे. तर ८४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.