1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (16:19 IST)

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चार हजार कैदी मुक्त

Four thousand prisoners
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चार हजार कैद्यांना मुक्त करण्यात आलं आहे अशी माहिती राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. राज्यभरातील कैद्यांची पेरोल, तात्पुरता जामीन आणि जामिनावर सुटका करण्यात आली आहे. यामध्ये आयपीसी प्रकरणातील आरोपी आणि कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, विशेष कायद्यातील आरोपीनांही सोडण्याबाबत  विचार करण्यात यावा, अशी याचिका मुंबई न्यायालयातील वरिष्ठ वकील सतीश तळेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
 
राज्यात 60 जेल आहेत. या जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने यापैकी अकरा हजार कैद्यांना सोडण्यात यावे, असा निर्णय राज्य सरकारने दिला होता. त्यानुसार, गेल्या महिन्याभरात 4 हजार 60 आरोपी, कैद्यांना सोडण्यात आल्याची माहिती राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. त्याचप्रमाणे राज्यभरातील जेलमध्ये एकही कोरोनाबाधित कैदी नसल्याचं जेल प्रशासनातर्फे उच्च न्यायालयाला सांगण्यात आलं आहे.