शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (09:25 IST)

राज्यातील एका मंत्र्याला कोरोनाची लागण

देशभरातील एकूण कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात आता एका मंत्र्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या मंत्र्याला ठाण्याहून मुंबईला हलविण्यात आले असून सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाबाधित मंत्र्याच्या बंगल्यातील १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे यापूर्वी समोर आले होते. तसेच मंत्र्याची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र आता दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईच्या सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.