सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (09:16 IST)

मालेगाव कोरोना रुग्णांची शंभरी पार केलेला राज्यातील पहिला तालुका

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याने कोरोना रुग्णांची शंभरी पूर्ण केली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे १०० रुग्ण पार करणारा मालेगाव तालुका हा राज्यात पहिला ठरला आहे. गुरुवारी पहाटे मालेगावमधील आणखी नव्या ५ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याने कोरोना बाधितांची संख्या १०१ झाली आहे.
 
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ११५ जण कोरोना बाधित असून यात सर्वाधिक जास्त रुग्ण मालेगाव मधीलच आहे. जिल्ह्यात ११४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.यात मालेगावचे ९७ रुग्ण निगेटिव्ह होते. त्यामुळे काहीसा दिलासा जिल्हा प्रशासनाला मिळाला होता. मात्र ५ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याने पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबई, पुणे, ठाणे पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने राज्यात नाशिक चौथ्या स्थानावर आहे.