गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 3 मे 2020 (14:58 IST)

पुण्यातील करोनाग्रस्तांवर ‘प्लाझ्मा थेरपी’साठी मिळाली परवानगी

pune
करोनामुळे चिंताजनक वातावरण पुणेकरांना दिलासा देणारी बातमी म्हणजे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्यास  परवानगी दिली आहे.
 
सध्या पुणे रेड झोनमध्ये आहे. अनेक भागांना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. प्लाझ्मा थेरपी करोनाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरत असल्याचं वैद्यकीय पाहणीतून समोर आलं होतं. त्यामुळे आयसीएमआरनं ही थेरपी उपचारासाठी वापरण्यास सुरूवात केली. देशातील अनेक ठिकाणी ही थेरपी वापरली जात आहे. 
 
पुणे जिल्हा प्रशासनानंही प्लाझ्मा थेरपीची करोनाग्रस्त रुग्णांवर चाचणी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. प्रशासनाची मागणी मान्य करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी करण्यास आयसीएमआरनं परवानगी दिली आहे.