शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: पुणे , शनिवार, 2 मे 2020 (10:37 IST)

कोरोना व्हायरस : पुण्यात मृतांची संख्या १००वर

पुण्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा हा १०० वर पोहोचला आहे. कालपर्यंत हा आकडा ९९ वर होता, मात्र मध्यरात्री ससून रुग्णालयातील एका 68 वर्षाच्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १०० वर गेली आहे. संबंधित रुग्णाला २४ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुणे आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

कालपर्यंत पुण्यात ७ कोरोना रुग्णांचा बळी गेला होता. तर कालच्याच दिवशी ११५ नव्या रुग्णांची वाढ झाली असून एकूण रुग्णसंख्या १८१५ इतकी आहे. पुण्यात आतापर्यंत ५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात काल एकाच दिवशी १००८ नव्या रुग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांची संख्या ११ हजारांच्या पार गेली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या झोनच्या निकषांनुसार मुंबई पाठोपाठ पुणे देखील रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे लॉकडाउनची कोणतीही सवलत रेड झोनमधील जिल्ह्यांना मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.