शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मे 2020 (19:04 IST)

मोठी बातमी: देशातील लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांनी वाढला

lockdown extended for two weeks more
केंद्र सरकारने देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात केंद्राने एक पत्रक जारी केलं आहे. 3 मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
या लॉकडाउन दरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सर्व राज्यांमधील करोनाग्रस्तांची माहिती आणि त्याची समिक्षा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
 
४ मेपासून पुढील दोन आठवडे हा लॉकडाउन लागू असणार आहे. या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचेही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. 
 
या दरम्यान ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त काही सवलती देण्यात येतील. परंतु रेड झोनमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.