बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : गुरूवार, 21 मे 2020 (11:34 IST)

या देशात आकाशातून पडल्या करोना विषाणूच्या आकारातील गारा

ice balls of corona shape
करोना व्हायरसमुळे जगभरामध्ये दहशत निर्माण झाली आहे. करोनाच्या भीतीमुळे लोक आपआपल्या घरात कैद झाले आहे. अशात मेक्सिको देशात एक विचित्र घटना घडली. येथील काही भागांमध्ये गारांचा पाऊस पडला पर चर्चेचा विषय म्हणजे या गारा चक्क करोना विषाणूच्या आकाराच्या आहेत. 
 
मेक्सिकोच्या उत्तरेकडे असणाऱ्या न्यूवो लियोन राज्यमधील मोंटेमोरेलोस शहरामध्ये गारांचा पाऊस झाला. येथील स्थानिकांनी गारांचे फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करत गारा करोना विषाणूच्या आकाराच्या असल्याचे म्हटले आहे. गोल आकाराच्या गारांना काट्यांसारखी टोकं असल्याचेही दिसत आहे. येथील स्थानिक याला देवाचा प्रकोप असल्याचे मानत आहेत. यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. 
 
अशाप्रकारे करोना विषाणूच्या आकाराच्या गारांचा पाऊस केवळ मॅक्सिकोमध्ये झालेला नाही तर वेगवेगळ्या देशांमधील लोकांनी आपल्या भागामध्ये झालेल्या पावसामध्ये करोना विषाणूच्या आकाराच्या गारा पडल्याचा दावा केला आहे. साऊदी अरेबियामधील एका व्यक्तीनेही अशा प्रकारचा दावा केला आहे.
 
मात्र हवामान श्रेत्रातील तज्ज्ञांनुसार अश्या आकाराच्या गारा पडणे अगदी सामान्य गोष्ट आहे. 
 
हवामानशास्त्रज्ञ आणि जागतिक हवामान संस्थेचे सल्लागार जोस मिगुएल विनस यांनी म्हटले की अनेकदा जोरदार वादळ आणि वाऱ्यासहीत गारांचा पाऊस होतो तेव्हा गारा एकमेकांना आदळतात आणि त्यांचा आकार बदलतो. एकमेकांना आदळल्याने किंवा मोठ्या आकाराच्या गारेचे तुकडे होऊन छोट्या आकाराच्या गारा तयार होताना असा आकार गारांना येतो. 
 
करोनामुळे आधीच मॅक्सिकोमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असताना या गारांच्या पावसामुळे स्थानिकांमध्ये आणखीन भिती निर्माण झाली आहे.