बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

आपण देखील PM मोदींची दिवाळीला केवळ Made in India प्रॉडक्ट खरेदी करा अशी चिट्ठी शेअर केली असेल तर...सत्य जाणून घ्या

प्रत्येक दिवाळी येण्यापूर्वीपासूनच चायनीज लाइट्स आणि फटाक्यांचा बहिष्कार तसेच स्वदेशी सामान वापरण्याची अपील होत असते. यंदा सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नावावर एक चिट्ठी व्हायरल होत आहे, ज्यात दिवाळीसाठी केवळ भारतात तयार होणारे प्रॉडक्ट्स खरेदी करण्याबद्दल अपील करण्यात आली आहे. या चिट्ठीत मोदींचे हस्ताक्षर देखील आहेत.
 
व्हायरल चिट्ठीत काय आहे-
 
चिट्ठीत लिहिले आहे- ‘माझे प्रिय भारतीय आपण केवळ एवढे करा की येणार्‍या दिवाळी सणाला आपल्या घरातील प्रकाश, सजावट आणि मिठाई या सगळ्यांसाठी केवळ भारतात तयार सामुग्री वापरा. आपण या प्रधान सेवकांची गोष्ट मान्य कराल अशी उमेद आहे. आपण लहान-लहान पावलांनी माझी साथ दिली तर मी वचन देतो की की आमचं भारत जागतील सर्वात पुढील रांगेत प्रथम स्थानावर उभे असेल'
 
खरं काय आहे- 
 
सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या चिट्ठीची तपासणी करण्यासाठी आम्ही Yandex इमेज रिव्हर्स सर्च वापरले, तर आम्हाला पीएमओ द्वारे 2016 मध्ये केलेलं एक ट्विट सापडलं. त्यात माहीत पडले की सोशल मीडियात व्हायरल होत असलेली चिट्ठी बनावटी आहे.
 
पीएमओने लिहिले होते, ‘पीएमच्या ‘हस्ताक्षर’सह काही अपील सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. हे कागदपत्रे खरे नाही.
 
उल्लेखनीय आहे की तीन वर्षांपूर्वी रिटायर्ड आयपीएस आणि पुड्डुचेरीची उपराज्यपाल किरण बेदी यांनी देखील या बोगस चिट्ठीला खरं समजून ट्विटरवर शेअर केली होती.
 
नंतर त्यांनी यावर खेद प्रकट करत स्पष्ट केले होते की ‘मला सूचना मिळाली आहे की हा संदेश पंतप्रधान मोदींचा नाही. मला या पोस्टवर दु:ख आहे. तरी वैयक्तिक रूपाने मी आपल्या देशात तयार उत्पादनांना प्राथमिकता देते. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे.’
 
पीएम मोदी देखील भारतीय उत्पादांचे समर्थक असून अनेकदा त्यांनी खादी वापरण्यावर जोर दिलेला आहे. दिवाळीला कुंभारांकडून मातीचे दिवे आणि कळश खरेदी करण्याचा आग्रह करतात तरी ही चिठ्ठी मात्र फेक आहे.
 
वेबदुनियाला आपल्या तपासणीत सोशल मीडियावर पीएम मोदींच्या नावावर व्हायरल होत असलेली चिट्ठी फेक असल्याचे कळून आले.